Surprise Me!

डॉ. होमीभाभा टॅलेंट सर्च परीक्षेत लावण्या सोनवणे अव्वल; मिळाली इस्रोत जाण्याची संधी

2025-05-04 33 Dailymotion

<p>जळगाव : डॉ. होमीभाभा टॅलेंट सर्च परीक्षेत जळगाव शहरातील लावण्या सोनवणे या विद्यार्थिनीनं महाराष्ट्रातून तिसरा क्रमांक तर, खान्देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. खान्देशातून दहा हजार विद्यार्थ्यांमधून लावण्या सोनवणे ही परीक्षेत प्रथम आली आहे. या परीक्षेत महाराष्ट्रातून तिसऱ्या क्रमांकानं उत्तीर्ण झाल्यानं लावण्याचा मुंबई इथं झालेल्या कार्यक्रमात 'द इन्स्पायरिंग यंग सायंटिस्ट अवॉर्ड'नं गौरवण्यात आलं. एवढेच नव्हे तर, लावण्याला  भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोला भेट देण्याची संधी मिळाली. चार दिवसाच्या भेटीत तिला इस्रोमध्ये सुरू असलेल्या  उपग्रह आणि अवकाश संशोधनाची माहिती जाणून घेण्याची संधी मिळाली. "इस्रो या संस्थेला भेट दिल्याचा खूप आनंद झाला," अशी भावना लावण्यानं व्यक्त केली. मुलीनं एवढ्या कमी वयात मिळवलेल्या यशाबद्दल तिच्या आई-वडिलांनी लावण्याचं कौतुक करत अभिमान व्यक्त केला आहे. तिनं शास्त्रज्ञ व्हावं अशी अपेक्षाही आई-वडिलांनी व्यक्त केली आहे.</p>

Buy Now on CodeCanyon